नमस्कार, आज २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. गेले ४-५ वर्ष आम्ही मराठी टायपिंग डॉट कॉम मधून मराठी भाषेच्या विविध संगणकीय प्रणाल्या, फॉन्ट, टायपिंग ट्युटोर व इतर टिपा देत असतो. आजपर्यंत या संकेतस्थळाच्या माध्यमातून ६,७६,६१४ लोकांनी भेटी दिल्या ज्यामध्ये १५,००,००० हून अधून वेळा पाने पहिली गेली. सध्या आपले संकेतस्थळ ५०० हून अधिक मोफत मराठी फॉन्ट पुरविते.
आपल्या मराठी प्रेमामुळेच आम्ही हे करू शकलो. आजच्या मराठी भाषा दिना निमित्त आम्ही आपणास एक आवाहन करू ई इच्छित आहे कि आपल्या संकेतस्थळावर मराठी टायपिंग डॉट कॉम बद्दल नक्की लिहा, फेसबुक वर शेअर करा, जेणेकरून आणखी हजारो, लाखो लोकांना त्याचा उपयोग होईल.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
~ मराठी टायपिंग डॉट कॉम
आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे वाचून मन भरारी घे़त भारतात गेले.